औरंगाबाद : दौलताबाद येथील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या वंजरवाडी येथील रेल्वे पुला जवळ मालवाहू गाडी चे आठ डब्बे रुळावरून घसरले ही घटना शनिवारी (ता.दोन) पहाटे चारच्या सुमारास घडली. या घटने नंतर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. घटने नंतर रोटेगाव काचीगुडा पैसेंजर ही पोटूळ रेल्वे स्टेशनवर थांबलेली आहे.
जालन्याहून येणारी दादर जनशताब्दी औरंगाबाद स्थानकावर थांबलेली आहे.
निजामाबाद पुणे पैसेंजर सुद्धा औरंगाबाद स्थानकावर थांबलेली आहे. अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्थानकावर थांबली आहे. दौलताबाद जवळ रेल्वे घसरल्याने रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी किमान दुपारी 12 ते 1 वाजेल असा प्राथमिक अंदाज रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
#Aurangabad #AurangabadTrainAccident #TrainAccident #AurangabadNews #Daulatabad #AurangabadPincode #BreakingNews #esakal #SakalMediaGroup